
झाशीमध्ये श्राद्धविधीदरम्यान सुखनई नदीत झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. देवीसिंह पुरा येथे राहणारे अनुप तिवारी (45), आपला मुलगा अर्पित (12), भाचा पुष्कर शुक्ला (23), पुतणे अभिनय तिवारी (26) आणि श्रेयांश तिवारी (21) यांच्यासोबत सुखनई नदीच्या काठावर पिंडदान करण्यासाठी गेले होते. अनुप पूजा करण्यासाठी नदीत उतरले होते.
अमेरिकेत दोन हिंदुस्थानींना अटक
अमेरिकेत वजन कमी करण्याचे बनावट औषध (ओझेम्पिक) विकल्याच्या आरोपावरून दोन हिंदुस्थानी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. स्वप्नदीप रॉय आणि विक्की रमण अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनी चीनमधून बनावट औषध मागवून ते अमेरिकेतील वितरकांना कमी किमतीत विकले. त्यांनी जुलै 2023 ते एप्रिल 2024 पर्यंत हा धंदा केला आहे.
दिल्ली बलात्कार, आरोपपत्र दाखल
दिल्लीत दोन महिन्यांपूर्वीच्या स्लीपर बसमधील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात 398 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. बसमधून काही पुरावे मिळाले होते. त्यात वीर्याचे नमुने आणि केसांचा समावेश आहे. आरोपपत्रात पोलीस कर्मचारी, डॉक्टर आणि इतरांसह दहा साक्षीदारांचे जबाब आहेत. पोलिसांनी बसचालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक केली होती.
दिल्लीत 10 चिनी ड्रोन जप्त
दिल्ली विमानतळावर कस्टम्सने तीन हिंदुस्थानी प्रवाशांकडून 1.03 कोटींचे दहा लष्करी ड्रोन जप्त केले. हे तिन्ही प्रवासी हाँगकाँगहून व्हिएतनाममार्गे टर्मिनल-3 वर पोहोचले होते. सामानात चिनी कंपनी ऑटेल रोबोटिक्सचे 10 एमडीएक्स-1 ड्रोन, 11 पंट्रोलर, 10 कॅमेरा गिंबल, 60 प्रोपेलर, 20 अँटेना, 40 जॉयस्टिक आणि आयपह्न 18 प्रो मॅक्सचा समावेश आहे. हिंदुस्थानात परदेशी ड्रोनच्या आयातावर बंदी आहे.


























































