
बीडमध्ये बेफाम झालेल्या गुन्हेगारी व खुन्यांविरोधात लोक रस्त्यावर उतरले. सिंधुदुर्गात श्रीधर नाईकांच्या राजकीय हत्येने एक गुंडाराज सुरू झाले. तेसुद्धा लोकांनी थांबवले. ठाण्यात पुर्णेकरांच्या हत्येने लोक या क्षणी मूकबधिर झाले आहेत, पण तेही उसळून बाहेर येतील. मिंधेंच्या माफिया राजची ‘लेडी डॉन’ मीनाक्षी शिंदेंचा एक ‘ऑडिओ’ बाहेर आलाय, त्यात त्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच्या नावाने धमकी देतायत. प्रदीप पुर्णेकर यांना घरात घुसून मारण्याची भाषा करतायत व शेवटी पुर्णेकर निर्घृणपणे मारले गेले. ठाण्यातील महिलांनी गृहमंत्री फडणवीसांना बांगडय़ा पाठवाव्यात. अमित शहांना पुर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे पाठवावेत आणि ठाणे पोलीस आयुक्तांना साडी–चोळीचा आहेर द्यावा! काही झाले तरी पुर्णेकरांचा खून आम्ही पचू देणार नाही!
मुंबईसह महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत बोंब सुरू आहे. अनेक जिल्हय़ांत गुन्हेगारीचा बीड पॅटर्न सुरू झाला असून मुंबईलगतच्या ठाण्यात या बीड पॅटर्नने खळबळ उडवली आहे. ठाणे हे कधी काळी महाराष्ट्रातले सभ्य व सांस्कृतिक शहर म्हणून गणले जात होते. हा लौकिक आता संपला आहे. ठाणे हे गुंडांचे व झुंडांचे शहर बनवण्यात आले आहे. ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृणपणे हत्या झाली. हल्लेखोर आले व त्यांनी बंदुकीचे सात राऊंड फायर केले. त्यात पुर्णेकरांचा मृत्यू झाला. पुर्णेकरांच्या रक्ताचे शिंतोडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जॅकेटवर उडाले आहेत. गृहमंत्रीपद हे राजकीय विरोधकांचा छळ करण्यासाठी किंवा बेइमान, गद्दारांना संरक्षण देण्यासाठी नसते, तर जनतेच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी असते. जनतेच्या रक्षणाच्या बाबतीत फडणवीस अपयशी ठरले आहेत. पुर्णेकरांची हत्या ही ठाण्यातील राजकीय हत्या आहे. मिंधे गटाच्या वैमनस्यातून पुर्णेकरांवर गोळय़ा झाडल्या हे उघड झाले आहे. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे व त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी पुर्णेकरांच्या हत्येचे कारस्थान रचले व इतर गुन्हेगारांच्या मदतीने ‘हत्ये’चे कारस्थान अमलात आणले. गोळय़ा झाडणाऱ्या गुन्हेगारांची मीनाक्षी शिंदे यांच्या निवासस्थानी ये-जा होती, असा जबाब पुर्णेकरांच्या सज्ञान चिरंजीवाने दिला. त्यामुळे या हत्येचा संशय ठाण्यातल्या मिंधे गटावर जातो, पण पोलिसांकडून खुनाचे
कारस्थान रचणाऱ्या
सूत्रधाराचे नाव ‘एफआयआर’मध्ये घेण्यास टाळले गेले. बीडमध्येदेखील अनेक वर्षे हे असेच सुरू होते. त्या गुन्हेगारीचा शेवट संतोष देशमुख यांच्या बलिदानाने झाला. ठाण्यातही अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अंत जवळ आला आहे. त्यासाठी पुर्णेकरांना बलिदान करावे लागले. ठाण्यात महिनाभरात पाच हत्या झाल्या. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. ठाणे हा माफियांचा, अमली पदार्थांच्या धंद्याचा, खंडणीखोरांचा मोठा अड्डा बनला आहे, परंतु पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. फडणवीस मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील माफियागिरीविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचाही आवाज भाजपच्या ‘वर’च्या लोकांनी दाबला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या राजकारणास गृहमंत्री अमित शहांचा वरदहस्त आहे. अमित शहांनी गुजरातमध्ये राज्यमंत्री असताना व केंद्रात गृहमंत्री झाल्यावर गुंड टोळय़ा, त्यांचे म्होरके, भ्रष्ट राजकारण्यांना भाजपमध्ये आणले व या गुंड-झुंडांना राजकीय प्रतिष्ठा देण्याचा निर्लज्ज प्रयत्न केला. शहांच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांमुळे पंतप्रधान मोदींची प्रतिमा साफ काळवंडली आहे. अमित शहांना आज पंतप्रधान व्हायचे डोहाळे लागले आहेत व शहा पंतप्रधान व्हावेत म्हणून त्यांनी राजकारणात आणलेल्या माफिया, भ्रष्ट टोळय़ा लॉबिंग करत आहेत. आसामचे हेमंत बिस्वा सर्मा, प. बंगालचे सुवेंदू अधिकारी, महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे यांच्यासारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अमित शहांनी आपल्या रथास जुंपले आहेत आणि त्यांच्या भरवशावर ते दिल्लीचे तख्त काबीज करायला निघाले आहेत. शहा यांच्या काळात
देशभरातील गुन्हेगारांना
व त्यांच्या कारवायांना उघड संरक्षण मिळाले. ठाणे शहर त्याच गुन्हेगारी राजकारणाचा दुष्परिणाम भोगत आहे. प्रदीप पुर्णेकरांची हत्या याच मानसिकतेतून झाली. खुन्यांना खात्री आहे की, एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहेत आणि शिद्यांना वाटते ‘सबका डॉन’ अमित शहा आपल्या पाठीशी आहेत. यात मधल्या मध्ये महाराष्ट्राचे गृहखाते सांभाळणाऱ्या फडणवीसांचा लटकता बुलबुल झाला आहे. ठाण्याच्या पोलिसांवर त्यांचे नियंत्रण नाही. दहा-दहा वर्षे पोलीस अधिकारी ठाण्यात चिकटून बसले आहेत. त्यांच्या निष्ठा वर्दीशी नसून माफिया राज चालवणाऱ्या उपमुख्यमंत्री मिंधेंशी आहेत. त्यांनी घातलेल्या खाकी वर्दीशी ही बेइमानी आहे. बीडमध्ये बेफाम झालेल्या गुन्हेगारी व खुन्यांविरोधात लोक रस्त्यावर उतरले. सिंधुदुर्गात श्रीधर नाईकांच्या राजकीय हत्येने एक गुंडाराज सुरू झाले. तेसुद्धा लोकांनी थांबवले. ठाण्यात पुर्णेकरांच्या हत्येने लोक या क्षणी मूकबधिर झाले आहेत, पण तेही उसळून बाहेर येतील. मिंधेंच्या माफिया राजची ‘लेडी डॉन’ मीनाक्षी शिंदेंचा एक ‘ऑडिओ’ बाहेर आलाय, त्यात त्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच्या नावाने धमकी देतायत. प्रदीप पुर्णेकर यांना घरात घुसून मारण्याची भाषा करतायत व शेवटी पुर्णेकर निर्घृणपणे मारले गेले. ठाण्यातील महिलांनी गृहमंत्री फडणवीसांना बांगडय़ा पाठवाव्यात. अमित शहांना पुर्णेकरांचे रक्ताने भिजलेले कपडे पाठवावेत आणि ठाणे पोलीस आयुक्तांना साडी-चोळीचा आहेर द्यावा! काही झाले तरी पुर्णेकरांचा खून आम्ही पचू देणार नाही!






























































