
>> नीलिमा प्रधान
मेष – चातुर्याने वागा
बुध, शुक्र युती. प्रेमाचे, चातुर्याचे बोल तुम्हाला यश देतील. राग, अहंकार, अपमानाचा विचार न करता कामे करा. नोकरी टिकवा. कायदा मोडेल असे कृत्य नको. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. शुभ दि. 7, 8
वृषभ – प्रकृतीची काळजी घ्या
सूर्य, चंद्र लाभयोग. प्रकृतीची काळजी घ्या. मनावर दडपण येईल. क्षुल्लक अडचणीवर मात कराल. महत्त्वाच्या वस्तू जपा. नोकरीत स्पर्धा करणारे लोक सहवासात येतील. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा राहील. शुभ दि. 4, 6
मिथुन – प्रगतीचा उच्चांक गाठाल
चंद्र, गुरू युती. किचकट कामे उरकून टाका. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा उच्चांक गाठाल. नवीन परिचय उत्साहवर्धक. नवे धोरण ठरवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. प्रतिष्ठा लाभेल. स्वतचे स्थान पक्के करा. शुभ दि. 5, 6
कर्क – रागावर नियंत्रण ठेवा
सूर्य, चंद्र लाभयोग. दिशादर्शक कालावधी. कठीण महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे अडचणी वाढणार नाहीत. नोकरीधंद्यात प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल. शुभ दि. 6, 7
सिंह – दुखापत टाळा
बुध, शुक्र युती. संतापजनक घटना घडतील. दुखापत टाळा. वेळेचा उपयोग लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करा. नवीन ओळख आनंद देणारी. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनतेच्या मनात स्थान राहील. शुभ दि. 7, 8
कन्या – पुढे जाण्याची संधी लाभेल
बुध, शुक्र युती. तुमच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी येईल. योग्य प्रकारे काम करून निर्णय घ्या. नोकरीधंद्यात जम बसेल. चर्चेत, करारात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर यश लाभेल. स्वतचे स्थान मजबूत करा. शुभ दि. 4, 5
तूळ – अडचणी कमी होतील
बुध, शुक्र युती. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. कुणालाही कमी लेखू नका. कायदा पाळा. यशातील अडचणी कमी होतील. नोकरीत सहनशीलता ठेवा. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा बाऊ न करता कामे करा. शुभ दि. 4, 6
वृश्चिक – विचारपूर्वक व्यवहार करा
सूर्य, चंद्र लाभयोग. भावना व व्यवहाराची गल्लत नको. अनुभवांच्या आधारे निर्णय घ्या. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. धंद्यात आळस नको. हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. गुप्त कारवायांकडे लक्ष द्या. शुभ दि. 5, 6
धनु – योजनांची पूर्ति करा
सूर्य, चंद्र लाभयोग. कुणाच्याही आहारी न जाता तुमच्या क्षेत्रात कामे करा. धोका पत्करू नका. स्वतची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. योजना पूर्ण करा. शुभ दि. 7, 8
मकर – नव्याने कार्यरचना करा
बुध, शुक्र युती. तुमच्या क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय व्यावहारिक ज्ञान देणारा ठरेल. नोकरीत वरिष्ठांना खुष कराल. धंद्यातील समस्या सोडवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्याने कार्यरचना करा. प्रतिष्ठा, लोकप्रियता मिळवा. शुभ दि. 5, 6
कुंभ – प्रवासात काळजी घ्या
बुध, शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो आग्रही भूमिका नको. प्रवासात काळजी घ्या. निष्कारण तणाव वाढतील. धंद्यात सहनशीलता ठेवा. कुणालाही कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जुना वाद निर्माण केला जाईल. नम्र रहा. शुभ दि. 4, 7
मीन – निर्णय फसवा ठरेल
सूर्य, चंद्र लाभयोग. अनाठायी खर्च टाळा. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय फसवा ठरेल. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नोकरीधंद्यात स्पर्धा वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे मांडताना कायदा पाळा. व्यवहारात अडकू नका. शुभ दि. 5, 6





























































