आशुतोष दीक्षित देशाचे नवे हवाई दल प्रमुख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हाइस एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुख (एअर चीफ मार्शल) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे 20 प्रकारचे फायटर जेट्स उडवण्यात माहीर असून ते अत्यंत अनुभवी अधिकारी आहेत. ते कारगील युद्धाचाही भाग होते. एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे सध्या भारतीय वायुसेनेचे 51 वे व्हाइस एअर चीफ ऑफ स्टाफ होते.