ज्ञानेश कुमार हटत नाहीत तोवर थांबणार नाही – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिला आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. त्

राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले आहे की, “जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन थांबवणार नाही. देशातील सर्वात पवित्र गोष्टीचे रक्षण करण्यासाठी हा आमचा लढा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आम्हाला काहीही करून रोखू शकणार नाहीत.”

सध्याची परिस्थिती पाहता आता राजीनामे आणि कारवाई करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या या प्रक्षोभापुढे हे अहंकारी सरकार फार काळ टिकू शकणार नाही, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, आज आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना बाराखंबा पोलीस ठाण्यात नेले आणि दोन तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.