इंडिगो विमानावर हवेतच कोसळली वीज, लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटणाहून लखनौला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानावर उड्डाणादरम्यान हवेतच अचानक वीज कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अनपेक्षित घटनेनंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत लखनौ विमानतळावर विमानाचे तातडीने इमर्जन्सी लँडिंग केले.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान हवेत असताना अचानक जोरदार वीज विमानावर पडली. या विजेच्या आघातामुळे विमानाचा पुढचा भाग क्षतिग्रस्त झाला आहे. मात्र सुदैवाने वेळीच आणि सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

या भयानक घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या विमानतळ प्रशासन आणि तांत्रिक पथकाकडून खराब झालेल्या या विमानाची सविस्तर तपासणी केली जात आहे.