‘ओपीडी’ आवारातच सुरू ठेवा, सर्वसामान्यांच्या आरोग्याशी तडजोड होऊ देणार नाही! शिवसेनेची व्ही. एन. देसाई रुग्णालयावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांताक्रुझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयामधील बाह्यरुग्ण विभाग विद्युत कामाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट घालणाऱया प्रशासनाला आज शिवसेनेने चांगलाच दणका दिला. शिवसेनेसह स्थानिक रहिवाशांनीही आंदोलनात सहभाग घेत बाह्यरुग्ण विभाग बंद करू नका, अशी मागणी केली. अखेर ताळय़ावर आलेल्या प्रशासनाने बाह्यरुग्ण विभाग बंद करणार नाही असे आश्वासन दिले.

कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे सांताक्रुझ परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय होणार होती. याची गंभीर दखल घेत शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली आज रुग्णालयावर धडक देण्यात आली. बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता घेण्यात आल्याने तीव्र नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरसेविक पूजा महाडेश्वर, गीतेश राऊत, सदा परब, रोहिणी कांबळे, प्रज्ञा भुतकर, हरी शास्त्राr यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. शिवाय पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदनही देण्यात आले आहे. विद्युत काम होत असेल तर पर्यायी व्यवस्था रुग्णालयाच्या आवारातच करावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.