ट्रेंड – शिक्षकाचा विद्यार्थ्यांसह जबरदस्त डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये शिक्षक चक्क विद्यार्थ्यांसोबत ‘उडी उडी जाय’ या गाण्यावर ताल धरताना आणि मनसोक्त नाचताना दिसत आहेत. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि त्यांच्या आनंदाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे शाळेतील आठवणी अधिक खास होतात. शिक्षकाचा उत्साह आणि विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने केलेली धमाल पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. हा व्हिडीओ @dance_guru_krishna या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत.