
राज्य भीषण दुष्काळात होरपळत असताना आणि शेतकऱ्यांच्या पोरांना भ्रष्ट अध्यक्षांच्या विरोधात सत्याग्रहाला बसण्याची वेळ आली असताना, शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्यांना 10 कोटी रुपये खर्च करून परदेशात पाठवले, यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या दौऱ्यात कोणकोणते अधिकारी गेले आणि लंडनस्थित कंपनीला 5 कोटी रुपये देण्याचे नेमके कारण काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारने जनतेला दिली पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्य दुष्काळात होरपळत आहे. शेतकऱ्यांच्या पोरांवर भ्रष्ट अध्यक्षांच्या विरोधात सत्याग्रहाला बसण्याची वेळ आली आहे. एवढं होत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्यांना १० कोटी रुपये खर्च करून परदेशात पाठवलं. यापेक्षा मोठं दुर्दैव काय? या दौऱ्यात कोणकोणते अधिकारी गेले? त्या लंडनस्थित कंपनीला ५ कोटी रुपये देण्याचं कारण काय? या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावीत.
आज राज्यातील जनतेची गरज काय, विद्यार्थ्यांची मागणी काय आणि सरकारची प्राथमिकता काय?
सरकारने उद्योगविकास आणि अभ्यासाच्या नावाखाली परदेश दौरे करण्यापेक्षा, यापूर्वी झालेल्या परदेश दौऱ्यांतून नेमकं काय साध्य झालं, याचा लेखाजोखा आधी जनतेसमोर मांडावा.
@Dev_Fadnavis
https://t.co/FcJnd7Fjr4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 9, 2026
रोहित पवार यांनी एक्सवर याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्य दुष्काळात होरपळत आहे. शेतकऱ्यांच्या पोरांवर भ्रष्ट अध्यक्षांच्या विरोधात सत्याग्रहाला बसण्याची वेळ आली आहे. एवढं होत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या अधिकाऱ्यांना 10 कोटी रुपये खर्च करून परदेशात पाठवलं. यापेक्षा मोठं दुर्दैव काय? या दौऱ्यात कोणकोणते अधिकारी गेले? त्या लंडनस्थित कंपनीला 5 कोटी रुपये देण्याचं कारण काय? या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावीत. आज राज्यातील जनतेची गरज काय, विद्यार्थ्यांची मागणी काय आणि सरकारची प्राथमिकता नेमकी काय, असा सवाल करत रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने उद्योगविकास आणि अभ्यासाच्या नावाखाली अंधपणाने परदेश दौरे करण्यापेक्षा, यापूर्वी झालेल्या अशा परदेश दौऱ्यांतून नेमके काय साध्य झाले, याचा सविस्तर लेखाजोखा आधी जनतेसमोर मांडावा, अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी एक्स पोस्टद्वारे मांडली आहे.

























































