
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि एसआयआर प्रक्रियेविरोधीत राजधानी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे 10 ऑक्टोबरला आंदोलन होणार आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे हे आंदोलन होणार असून तत्पूर्वी वातावरण तापले आहे. दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या असून मेट्रो स्थानकं बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. तसेच या आंदोलनासाठी दिल्ली जाणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जात आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या पुण्यातील 18 कार्यकर्त्यांना मध्य प्रदेशमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी रवाना झाले आहेत. पुण्यातील 18 कार्यकर्तेही दिल्लीकडे रवाना झाले होते. मात्र त्यांना मध्य प्रदेशमधील इटारसी रेल्वे स्थानकावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप केला जात आहे. गुरुवारी रात्री त्यांना ताब्यात घेणअयात आले आहे, अशी माहिती ‘सिटीझन्स ऑफ जस्टिस अँड पीस’ या संस्थेने दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये न्यू स्टुडंट्स अँड यूथ फेडरेशन, आरआरआर महाराष्ट्र आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
इटारसी रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रेल्वेगाडीतून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना कोणत्याही अधिकृत पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी एका अज्ञात स्थळी हलवण्यात आले असून या जागेचा वापर तात्पुरते स्थानबद्धता केंद्र म्हणून केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. या संदर्भातील एक व्हिडीओही सीजेपीने शेअर केला आहे. विद्यार्थ्यांना एका बसमध्ये बसवून अज्ञात स्थळी नेण्यात आले आहे. ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि या कार्यकर्त्यांना नेमके कुठे ठेवण्यात आले आहे, याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे, अशी मागणी सीजेपीने केली.
जळगाव स्टेशनवरही अडवण्याचा प्रयत्न?
नागरिकांचा लोकशाही मार्गाने होणारा विरोध दडपण्यासाठी आणि आंदोलनातील सहभाग रोखण्यासाठीच हे पाऊल उचलले गेल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनीही जळगाव रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांना पुढे प्रवास करता आला होता, असा दावाही सीजेपीने केला आहे.
🚨 SOS 🚨
This government has crossed ALL limits now.
A group of students from Pune was on its way to Delhi to join the 10 October protest.
They have been detained midway and are now being taken away in a bus to an unknown location.
Where are they being taken? Who ordered this?
— Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 8, 2026
























































