दिल्ली मोदी-शहांची प्रॉपर्टी आहे काय? अभिजित दीपके यांचा मोदी सरकारवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो बंद करून टाकल्या, रेल्वे बंद करून टाकल्या, रस्ते ब्लॉक करून टाकले. आणीबाणीतही रेल्वे बंद झाल्या नव्हत्या, किती लोकांना डिटेन करतील? मी चाललोय, मलाही अटक करा, मलाही डिटेन करा. सौरभ दास, आशुतोष रांका तयार आहेत. दिल्ली ही नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांची प्रॉपर्टी आहे का? अशा शब्दांत सीजेपी संस्थापक अभिजित दीपके यांनी मोदी सरकारवर हल्ला केला.

जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकरण्यात आली यासंदर्भात बोलताना दीपके म्हणाले, ज्ञानेश कुमारांनी 13 कोटी मते हटवण्यापूर्वी परवानगी घेतली होती का? सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म 6 मधील बदलाला मंजुरीसुद्धा दिली नव्हती. मग, ज्ञानेश कुमारांनी कोणालाही न कळवता, कोणालाही न विचारता नावे कशी वगळली? जंतर मंतर हे आंदोलनासाठी निश्चित केलेले ठिकाण आहे. कलम 19 आपल्याला आंदोलन करण्याचा घटनात्मक हक्क देत असल्याचे सांगत, अटक झाली तरी चालेल, जंतर मंतरवर जाणारच, असा निर्धार दीपके यांनी व्यक्त केला.

राजाचे आयुष्य पोपटात…

आंदोलनापूर्वी या सरकारला जी भीती वाटतेय ते पाहता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आपला रक्तदाब तपासून घ्यावा. ज्ञानेश कुमार तुमच्यासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? यावरून हे स्पष्ट दिसतं की, राजाचे आयुष्य पोपटाच्या हातात आहे. ज्ञानेश कुमार तोच ‘पोपट’ आहे. तुम्ही त्याला पकडले तर राजासुद्धा जाईल, असा टोला दीपके यांनी लगावला.