चंद्रपूरच्या माता महाकाली मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरचे कुलदैवत असलेल्या माता महाकाली मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. पहाटे चार वाजता विधिवत घटस्थापना करून नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी माता महाकालीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या काळात महाकाली मंदिरात दर्शनासाठी येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानाचा विचार करून मंदिर परिसरात कुलरचीही व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांना दर्शनादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.