Live – आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या दणक्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी शिवसेनाभवना बाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना देखील ताब्यात घेतले. त्यामुळे आदित्य ठाकरे आक्रमक झाले होते. दुसऱ्या बाजूला मनसे नेते अमित ठाकरे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडून होते.

  • हे भाजप विरुद्ध भारत चित्र; ही दादागिरी, हुकुमशाही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही! आदित्य ठाकरे गरजले.

  • आंदोलनाची सविस्तर माहिती थोड्याच वेळात देणार
  • उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन
  • आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांनी गाडीवर चढून आंदोलकांशी साधला संवाद
  • आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या दणक्यानंतर सर्व आंदोलकांना पोलिसांनी सोडले
  • जोपर्यंत सर्व आंदोलकांना सोडत नाही तोपर्यंत आंदोलन करतच राहणार. अजुनही हे आंदोलन शांत आहे. पण जर आंदोलकांना हात लावला तर हे आंदोलन चिघळेल आणि त्याचे खापर फडणवीसांच्या डोक्यावर फुटेल.
  • आदित्य ठाकरे, अमित ठाकरे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात ठाण मांडून, आंदोलनकर्त्यांची तुफान गर्दी

  • आदित्य ठाकरे आक्रमक, पोलिसांच्या व्हॅनवर चढले.
  • पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले
  • गल्ली गल्ली मैं शोर है… मोदी- शहा व्होट चोर है… आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी
  • आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे यांचा शिवसेना भवनाबाहेर ठिय्या