
हिंदुस्थानचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे अनेकवेळा चर्चेत आला आहे. तसेच त्याला दुखापतीमुळे महत्त्वाच्या सामन्यांमधून अनेक वेळा बाहेर पडाव लागलं आहे. आता पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याला न्यूझीलंड-ए विरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकावं लागणार आहे. तर तिसऱ्या सामन्यात तो खेळणार का नाही हे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असल्याचं बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले आहे. इंडिया ‘ए’ आणि न्यूझीलंड ‘ए’ यांच्यामध्ये 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान तीन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
इराणी कपदरम्यान रेस्ट ऑफ इंडिया संघाचे नेतृत्व करताना पंतच्या डाव्या कुशीच्या स्नायूला दुखापत झाली होती. सध्या तो बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत निवड समितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी कुमार कुशाग्रचा पर्याय म्हणून इंडिया ‘ए’ संघात समावेश केला आहे. फिटनेस चाचणीनंतरच पंतचा या दौऱ्यातील सहभाग निश्चित होणार होता, मात्र वैद्यकीय सल्ल्यानुसार त्याला सुरुवातीच्या दोन सामन्यांतून विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे कुशाग्रला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी चालून आली आहे.
🚨 News 🚨
Rishabh Pant has been ruled out of the first two India A matches against New Zealand A.
Kumar Kushagra has been named as his replacement in the squad.
More Details ▶️ https://t.co/GlNfm5b5or
#NZAvINDA
— BCCI (@BCCI) October 12, 2026
इंडिया अ संघाचे नेतृत्व ध्रुव जुरेलकडे सोपवण्यात आले असून या संघात यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. त्याशिवाय देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन स्मरण, आकिब नबी, आकाश दीप, अंशुल कंबोज, मानव सुतार, मुकेश चौधरी, साई सुदर्शन, यश राठोड आणि मुकेश कुमार हे खेळाडू या दौऱ्यात देशाचे प्रतिनिधित्व करतील.



























































