
पती विवाहित होता ही बाब लपवून त्याने माझ्याशी विवाह केला. याने मला मानसिक धक्का बसला आहे. तेव्हा गर्भपातास परवानगी द्यावी, अशी मागणी एका महिलेने केली होती. ही मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली नाही. अशा प्रकारच्या कारणासाठी गर्भपातास परवानगी देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. गर्भपातासाठी परवानगी देण्यासाठी विशेष कायदा करण्यात आला आहे. कोणत्या कारणासाठी ही परवानगी द्यावी याची कारणे यात नमूद केलेली आहेत. बलात्कार पीडित, गर्भाला गंभीर आजार, गरोदर असताना पतीचे निधन झाले किंवा घटस्पह्ट झाला, या प्रमुख कारणांसाठी गर्भपाताला परवानगी दिली जाते. असा कोणताही प्रकार याचिकाकर्त्या महिलेसोबत झालेला नाही. तेव्हा या गर्भपातास परवानगी देता येणार नाही, असा निर्वाळा न्या. भारती डांगरे व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने दिला.



























































