
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन करण्यात आले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांनी गनिमी कावा करत जंतरमंतरवर जाऊन तिरंगा उंचावून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलनासाठी रोज हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. यादरम्यान जनतेच्या लढ्याविरोधात सरकार सातत्याने टीका करत आहे. या टीकेला सीजेपी नेते अभिजित दीपके अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. हिंमत असेल तर अधिकृत आणीबाणी जाहीर करा, असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.
अभिजीत दीपके यांनी नागपूरमधून माध्यमांशी संवाद साधला असून सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. दीपके म्हणाले की, जर तुम्हाला आणीबाणी लादायचीच असेल, तर ती अधिकृतपणे जाहीर करा, असा भ्याडपणा का करत आहात? तुम्ही केवळ आरोप का करत आहात? तुमच्याकडे सर्व संसाधने आहेत, सर्व तपास यंत्रणा आहेत; मग पुरावे सादर करा, तपास करा आणि काय ती कारवाई करा… अशा शब्दात दीपके यांनी सरकारला सुनावले.
VIDEO | Napur, Maharashtra: CJP founder Abhijit Dipke says, “If you want to impose Emergency, do so officially, why are you being such a coward. Why are these people just making allegations? You have all the resources, you have all the investigative agencies, come up with the evidence, do the investigation and take some action…”
On senior advocate and former Solicitor General of India Harish Salve’s allegations, Dipke says, “I want to tell Harish Salve to please provide that evidence to Amit Shah. Somehow, Amit Shah has not been able to prove yet that we have been receiving foreign funding. So, if Harish has the evidence, he should hand it over to Amit Shah, because he is clearly struggling to find any.”
He added, “We will be having a meeting shortly, as soon as I land in Delhi, and after that, we will decide our next course of action.”
(Full video available on PTI Videos – https://t.co/bIyFWTfmBd)
— Press Trust of India (@PTI_News) October 14, 2026
दरम्यान, सीजेपीच्या या आंदोलनाला परदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला. त्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना अभिजित दीपक म्हणाले, मी हरीश साळवे यांना विनंती करेन की, त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर कृपया ते पुरावे थेट अमित शहा यांच्याकडे सुपूर्द करावेत. कारण, आम्हाला परदेशी निधी (foreign funding) मिळत असल्याचे अमित शाह यांना अद्याप सिद्ध करता आलेले नाही. जर हरीश यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते अमित शहांना द्यावेत, कारण ते पुरावे शोधण्यासाठी सध्या संघर्ष करत आहेत, असे दीपके यावेळी म्हणाले.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी लवकरच बैठक
या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल यावरही दीपके यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, मी दिल्लीत पोहोचताच आमची लवकरच एक बैठक पार पडेल. त्यानंतरच आम्ही आमची पुढील रणनीती ठरवू, असे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले आहे.




























































