पर्यटनासाठी सर्वोत्तम देशाच्या यादीत हिंदुस्थान 17 व्या क्रमांकावर; ग्रीस अव्वल तर जपान दुसऱ्या स्थानावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटन क्षेत्रातील नामवंत नियतकालिक ‘कोंडे नास्ट ट्रव्हलर’ने 2026 या वर्षातील जगातील सर्वोत्तम देशांची क्रमवारी जाहीर केली आहे. ‘रीडर्स चॉइस अवॉर्ड्स’च्या 29 व्या आवृत्तीअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत ग्रीस देशाने पहिला क्रमांक पटकावला आहे. हिंदुस्थानला या यादीत 17 वे स्थान मिळाले आहे.

‘कोंडे नास्ट ट्रव्हलर’तर्फे 1 एप्रिल ते 30 जून 2026 या कालावधीत एका सुरक्षित संकेतस्थळाद्वारे जागतिक पातळीवर सर्वेक्षण घेण्यात आले होते.

या क्रमवारीत ग्रीसने तब्बल 98.14 गुणांसह जगातील सर्वोत्तम देशाचा मान मिळवला आहे. या जागतिक क्रमवारीत भारताने 92.11 गुणांसह 17 वे स्थान पटकावून सर्वोत्तम 20 देशांमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहे.

केनिया टॉप-10 मध्ये

या यादीत ग्रीसनंतर जपान दुसऱ्या (97.01 गुण), इटली तिसऱ्या (96.48 गुण) आणि तुर्की चौथ्या (94.90 गुण) स्थानावर राहिले. त्यानंतर पोर्तुगाल पाचव्या, कोस्टा रिका सहाव्या तर क्रोएशिया सातव्या स्थानावर आहेत. इंडोनेशिया आठव्या, तर थायलंड दहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, कोस्टा रिका आणि नवव्या स्थानी असलेल्या केनियाने पहिल्यांदाच या यादीतील पहिल्या दहा देशांमध्ये धडक मारली आहे.