
बिहारमधील हाजीपूर येथील गंगा नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीत 15 हून अधिक जण प्रवास करत होते. रामपूर श्यामचंद गावाजवळ ही घटना घडली आहे. जेवणाचा कार्यक्रम करून हे सर्व जण बोटीने घरी परतत होते. दहाहून अधिक जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतरचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. दुर्घटनेनंतर लोकांनी नातेवाईकांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केले.



























































