रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेच्या 11 लाख 40 हजार कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस केंद्र सरकारने जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या उत्पादकता लिंक्ड बोनससाठी (पीएलबी) 2009 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि रेल्वेच्या माल वाहतूक व प्रवासी संख्येत झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.