महेला जयवर्धने मुंबई इंडियन्समधून बाहेर, पाच दिग्गज खेळाडूंच्या नावांची चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झाला आहे. महेला जयवर्धनेने राजीनामा दिल्याने फ्रँचायझीने आता नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्सने पाच उमेदवारांची निवड केली आहे, ज्यात मायकल हसी, अॅरॉन फिंच, इऑन मॉर्गन, मार्क बाउचर आणि एड्रियन बिरेल यांचा समावेश आहे.

महेला जयवर्धने यांच्या कार्यकाळात संघाने 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 2024 मध्ये ते मुख्य प्रशिक्षक म्हणून परतले, पण गेल्या दोन हंगामांत संघाने अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे त्यांनीच राजीनामा दिला आहे.