शुभवार्ता! रेल्वेत 5 हजार 236 पदांची मेगाभरती; 12 वी पास, पदवीधरांना नोकरीची संधी… 13 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेत नोकरी करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत वेगवेगळ्या पदांच्या तब्बल 5 हजार 236 पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अखेरची तारीख 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. बारावी पास आणि पदवी असलेल्या तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट www.rrbapply.gov.in वर देण्यात आली आहे.

रेल्वेत चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाऊंट असिस्टंट कम टाइपिस्ट, सीनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनिअर क्लार्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक) अशा पदांसाठी ही भरती केली जात आहे. या सर्व पदांसाठी बारावी पास आणि पदवीधर, तसेच संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग येणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांपर्यंत असायला हवे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. या सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार असून सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी 500 रुपये तर एससी, एसटी, महिलांसाठी 250 रुपये फी आकारली जाणार आहे.

पदवीधर तरुणांसाठी

  • तिकीट सुपरवाइजर                      127
  • गुड्स ट्रेन मॅनेजर             2750
  • असिस्टंट कम टाइपिस्ट               300
  • सीनियर क्लर्क कम टायपिस्ट       371
  • एकूण                            3548

बारावी पास तरुणांसाठी

  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क       700
  • अकाऊंट्स क्लर्क कम टाइपिस्ट     200
  • ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट       600
  • ट्रेन्स क्लर्क (लिपिक)                    188
  • एकूण                           1688