
मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये पेटलेला हिंसाचाराचा वणवा पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये हिंसाचाराच्या दोन घटनांमध्ये 4 जणांची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री झालेल्या संघर्षात एकाचा मृत्यू झाला तर, आज तीन जणांची संशयित पुकी बंडखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनांनंतर स्थानिकांनी इंफाळमध्ये मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर त्यांचे मृतदेह ठेवून निदर्शने केली. सातत्याने होत असलेल्या हिंसाचारानंतर मैतेई आणि पुकी समुदायातील तणाव पुन्हा भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी निदर्शकांना हटविण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.





























































