
जम्मू-कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराने सोमवारी शोध मोहिम राबवत एका गुहेतील दहशतवाद्यांचा तळ उद्धवस्त केला. या कारवाईत सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि दारुसाठा जप्त केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कोटरांका तहसीलच्या पंच गब्बर परिसरातील चोर हिल भागात सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम राबवली.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुप्त माहितीच्या आधारे लष्कराच्या ’60 राष्ट्रीय रायफल्स’च्या जवानांनी संबंधित जंगल परिसराला सोमवारी सायंकाळी वेढा गालत कसून शोध मोहीम राबवली. शोध मोहिमेदरम्यान, जवानांना जंगलात एक नैसर्गिक गुहा सापडली, जिथे दहशतवाद्यांचा तळ होता. या गुहेतून अंडर-बॅरल ग्रेनेड लाँचरचे नऊ ग्रेनेड्स, एक एके-47 मॅगझिन आणि एके-47 रायफलच्या 18 गोळ्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेला दारूगोळा ताब्यात घेण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित परिसरात शोध मोहीम सुरू आहे.

























































