ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेतील तीनशे शिक्षकांचा पाठिंबा;  ज. मो. अभ्यंकर यांनी मानले आभार

ज्ञान प्रसारक शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांचा मेळावा संदेश विद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी संस्थेचे विश्वस्त राजेंद्र म्हात्रे आणि डॉ. सुखदा म्हात्रे यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेशी असलेले ऋणानुबंध भविष्यात कायम राहतील असा त्यांनी संस्थेला विश्वास दिला. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेने शाळा आणि महाविद्यालये सुरू करून टागोर नगर, विक्रोळी व पार्कसाईट भागातील गरीब कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाची दारे विनामूल्य खुली केलीत, असे गौरवोद्गार अभ्यंकर यांनी काढले. आपल्या भाषणात राजेंद्र म्हात्रे आणि डॉ. सुखदा म्हात्रे यांनी संस्थेच्या परिवारातील सर्व शिक्षकांचा पाठिंबा अभ्यंकर यांच्या उमेदवारीस राहील आणि सर्व शिक्षक त्यांना निवडून आणण्यासाठी झटतील असे जाहीर केले. यावेळी प्रकाश शेळके, मच्छिंद्र खरात, आलम खान, आर. बी. पाटील, जगदीश भगत, विशाल बावा,  मुकेश शिरसाठ, सज्जाद मापारी, नाना राजगे, जालिंदर वाघमोडे, कलीम खान व इतर शिक्षक सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा न्यायाधीशाचा अहवाल

कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधीश पाठक यांच्याविरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश शहाडा न्यायालयात गेले होते. जिल्हा न्यायाधीश सकाळी सवा दहा वाजल्यापासून संध्याकाळी सवा सहा वाजेपर्यंत कोर्टात होते. न्यायाधीश पाठक हे सवा अकरा वाजता कोर्टात आले. त्यांच्या बोर्डावर 70 प्रकरणे सुनावणीसाठी होते. ही सर्व प्रकरणे फौजदारी होती. वकिलांशी कोणतीही सल्लामसलत न करता न्यायाधीश पाठक यांनी सुनावण्या तहकूब केल्या. नंतर ते न्यायालयाच्या आवारात फिरत होते. न्यायाधीश पाठक घरी दारू प्यायचे.

न्यायाधीशाला अशोभनीय वर्तनामुळे शिक्षा झाली असल्यास त्याला दिलासा देता येणार नाही, मात्र बाजू मांडण्याची संधी न देताच न्यायाधीशाचे निलंबन झाले असेल किंवा नियमांना बगल देऊन न्यायाधीशाच्या नोकरीवर गदा आणली जात असेल तर अशा प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.