
अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्या पावसानंतर मुंबईक साचलेल्या पाण्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ”पहिल्या पावासात मुंबईचे काय हाल झालेयत ते आपण सर्व बघतोय, आज सत्ताधाऱ्यांनी मुंबईला बुडवून दाखवलंय”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
”पहिल्या पावासात मुंबईचे काय हाल झालेयत ते आपण बघतोय. पाऊस जवळपास एक महिना उशिराने झालाय. नपावासाच्या आधीच्या कामांसाठी तुम्हाला एक महिना अधिकचा मिळाला. आम्ही गांधी मार्केट, हिंदमाता पूरमुक्त करून दाखवला होता. पण यांनी ती यंत्रणा सुरू केली नाही. काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं रद्द झाली. ही सर्व चित्र विकसीत भारतची नाही. आज सत्ताधाऱ्यांनी मुंबईला बुडवून दाखवलंय. प्रत्येक मुंबईकर टॅक्स पेयर आहे. मुंबईत पाणी कपात होती. ना यांना दुष्काळ सांभाळता येत ना यांना अतिवृष्टी सांभाळता येत आहे”, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.
”सध्याच्या महापौरांना मुंबईपेक्षा बांगलादेश, ढाकात जास्त रस आहे. त्या मुंबईत फिरतायत पण डोळ्यासमोर ढाका असेल. पहिल्यांदा मी असं चित्र पाहिलंय की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर एक अधिकारी मॅनहोलमध्ये पडतो. मुंबईची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला मुंबईची काळजी नव्हतीच. पण जी काम केली आहेत ती कशी झालीयत ते बघायची तरी काळजी घ्या. ना तुम्ही डिसॅलिशेनचा प्लॅन पूर्ण करू शकलात नाही तुम्ही रेन वॉटर होल्डिंग टँकचं काम पूर्ण करू शकला नाहीत. दिल्लीत काही झालं की नेहरूंवर जातात, मुंबईत काही झालं की ठाकरेंवर येतात”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.



























































