224 वरिष्ठ निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती, 41 एसीपींच्या बदल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज होईल, उद्या होईल अशी आस लावून बसलेल्या राज्यातील 224 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेश मंगळवारी गृह विभागाने अखेर जारी केले. या अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी आज बढती मिळाली.

राज्यातील अनेक वरिष्ठ निरीक्षक बढतीच्या प्रतीक्षेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते बढतीचे आदेश कधी निघणार याकडे नजरा लावून होते. अखेर आज तो दिवस उजाडला. 224 वरिष्ठ निरीक्षकांना सहाय्यक आयुक्तपदी बढती मिळाली. दरम्यान, याचबरोबर राज्यातील 41 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सर्वसाधारण बदल्यादेखील करण्यात आल्या. त्यांच्या बदल्यांचा आदेश आज जारी करण्यात आला.