
कोलकाता नाइट रायर्डस संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. आयपीएलच्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध रसेलने 2 षटकात 15 धावा देत 5 गडी बाद केले. मुंबईच्या संघाविरूद्ध 5 गडी बाद करणारा रसेल दूसरा खेळाडू ठरला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाचा गोलंदाज हर्षल पटेलने मुंबईच्या इंडियन्सच्या विरूद्ध 27 धावा देत 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. रसेलने हर्षल पटेलचा विक्रम मोडला आहे. आता रसेलच्या नावावर मुंबईच्या संघाविरूध्द सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम नोंद झाला आहे.
आयपीयलच्या इतिहासात रसेल हा पहिला खेळाडू आहे, ज्याने फक्त 2 षटकात 5 गडी बाद करण्याची किमया साधली आहे, तसेच रसेल च्या नावावर कोलकाता नाइटरायडर्सच्या संघाकडून सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याअगोदर सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रम फिरकी गोलंदाज सुनील नरेनच्या नावावर होता. नरेनने 2012 मध्ये कोलकाच्या घरच्या मैदानावर ईडन गार्डनवर पंजाब च्या संघाविरूद्ध 19 धावा देत 5 गडी बाद केले होते.
मुंबईचा कर्णधार रोहीत शर्माची आयपीएलमध्ये कोलकाता संघाविरूद्ध कामगिरी धडाकेबाज राहिली आहे. रोहितने कोलकाता नाइटरायडर्स संघाविरूद्ध खेळताना आयपीयलमध्ये 939 धावा बनवल्या आहेत. केकेआरच्या संघाविरूद्ध 1000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 61 धावांची आवश्यकता होती, परंतू 1000 धावांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. रोहितला केकेआरविरूद्ध झालेल्या कालच्या लढतीत 43 धावा बनवता आल्या. 1000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अजूनही 14 धावांची आवश्यता आहे.
आयपीएलच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याच खेळाडूला कोणत्याही एका संघाविरूद्ध 1000 धावांपेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. रोहितने आतापर्यंत केकेआरच्या संघाविरूद्ध 21 सामन्यात 46.76 च्या सरासरीने 982 धावा केल्या आहेत, त्यामध्ये 6 अर्धशतके आणि 1 शतक समाविष्ट आहे. रोहितने सर्वाधिक 109 धावांची खेळी केकेआरच्या संघाविरूद्ध आहे.
मुंबई विरूद्ध कोलकाता यांच्यात काल झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघाने 10 धावांनी सामना जिंकला. आंद्रे रसेलने गोलंदाजीत कमाल केली, मात्र फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकला नाही. रसेलने 15 चेंडूचा सामना करताना त्याला फक्त 9 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्स संघाचा फिरकी गोलंदाज राहूल चहरने 4 षटकात 4 गडी बाद केले. राहूल चहर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला.






























































