आर्यन खानची नवी सुरुवात, अमेरिकेत जाऊन स्वत: लिहिलेल्या प्रोजेक्टवर करणार काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कार्डेलिया क्रूज प्रकरणातून नुकतीच क्लीन चिट मिळाली आहे. त्यानंतर आर्यन आता स्वतःच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी अमेरिकेत जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेत जाऊन तो प्रोजेक्टचा आणखी विस्तार करणार आहे. आर्यनने शोचे लेखन केले आहे आणि दिग्दर्शनही तोच करणार आहे.

असं समजतंय की, आर्यनच्या आगामी वेब सीरिजला एका बडय़ा ओटीटी प्लॅटफॉर्मने हिरवा पंदील दाखवला आहे. तुरुंगाबाहेर येताच त्याने सीरिजवर काम सुरू केले. काही दिवसांपूर्वी मुंबईत त्यांनी टेस्ट शूट ठेवले होते. इंडस्ट्रीतील युवा टॅलेंट सहभागी झाले होते. आर्यन अमेरिकेत जाऊन वरिष्ठ लेखक आणि दिग्दर्शकांसोबत काम करणार आहे.

एनडीपीएस कोर्टाने आर्यनला सशर्त जामीन दिला होता. त्यामध्ये त्याला देशाबाहेर जाण्यास बंदी करण्यात आली होती. त्यामुळे तो देशात राहूनच सीरिजवर काम करत होता. आता क्लिनचिटनंतर तो देशाबाहेर जाऊ शकतो.