
‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांना जंतर मंतरवर आंदोलन करण्याआधीच विमानातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे वडील भगवान दीपके यांनी वडिलांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांकडून लोकशाही दडपण्याचे उघड कारस्थान आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे लोकशाहीला मानत नाहीत. ते गुजरातच्या दंगलीमधून तावून सुलाखून तयार झालेले आहेत, अशा शब्दांत अभिजित दीपके यांच्या वडिलांनी संताप व्यक्त केला. तर, अभिजित दीपकेंची आई अनिता यांनी संताप व्यक्त केला. अभिजित काय तिथे जाऊन दंगा करणार होता का? तो काही पाकिस्तानी नाही. आंबेडकरी जनताच सरकारला धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, अभिजित दीपके यांच्या आजी सावित्रीबाई दीपके (85) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.























































