त्रिंबक येथील तलाठी लाचलुचपच्या जाळ्यात, महसूल विभागात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सातबारावर झाडांची नोंद घालण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मालवण तालुक्यातील त्रिंबक येथील तलाठी भरत दत्ताराम नेरकर (32) याला सोमवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

कुडोपी येथील संबंधित तक्रारदाराने त्यांचे व्यावसायिक मित्र प्रभाकर परब यांच्याकडून झाडे विकत घेतली. त्या झाडांची नोंद सातबारावर नसल्याने त्या झाडांची नोंद सातबारावर घालण्यासाठी त्रिंबक तलाठी भरत नेरकर याने 5 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत विभागास दिल्यानंतर सोमवारी लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून त्रिंबक तलाठी भरत नेरकर याला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचेची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.