ओळख बदलून राहणाऱया हत्येतल्या आरोपीला अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

नालासोपारा येथील गौसिया मस्जिद ट्रस्टच्या जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱया आरोपीचा लपंडाव अखेर संपला. मुंबई गुन्हे शाखेने जोगेश्वरी येथे लपून राहणाऱया हत्येच्या वॉण्टेड आरोपीला अटक करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या 30 जानेवारीला गौसिया मस्जिद ट्रस्टचा जुना वाद उकरून काढत पाच ते सहाजणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली होती. तेव्हा सुफियान शेख (27) या तरुणाने सोबत आणलेला चाकू मरसवीर डायस ऊर्फ मच्चूभाई याच्या पोटात खुपसला होता. त्यात मच्चुभाई गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान मच्चुभाईचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा केल्यापासून आरोपी पसार होता. नालासोपारा पोलिसांना गुंगारा देत तो लपून राहत होता. अखेर सुफियानचा लपंडाव संपला. नालासोपारा येथील हत्येतला आरोपी जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरात राहत असल्याची खबर युनिट-10चे सपोनि धनराज चौधरी यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चौधरी व पथकाने रामगड विभाग परिसरात ओळख बदलून राहात असलेल्या सुफियान शेख याला पकडले.

पादचाऱयाच्या हातातला