मुलींच्या डोळ्यादेखत दहशतवाद्यांनी बहिणीसह भावोजींना मारले, अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या युद्ध आता भीषण रुप घेतले आहे. अशातच टिव्ही अभिनेत्री मधुरा नाईकने एक व्हीडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळल्याची माहिती दिली. हमासच्या दहशतवाद्यांनी तिची बहिण आणि भावोजींना दोन लहान मुलींच्या डोळ्यादेखत त्यांची हत्या केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत मधुरा म्हणते, ”मी मधुरा नाईक, हिंदुस्थानी वंशाची ज्यू महिला आहे. आम्ही हिंदुस्थानात 3000 हजार ज्यू राहिलो आहोत. 7 ऑक्टोबरच्या आदल्यादिवशी माझ्या कुटुंबाने मुलगी आणि मुलाला गमावले. माझी चुलत बहिण ओडाया आणि भावोजी यांना त्यांच्या दोन मुलींच्या डोळ्यादेखत त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ज्या दुख:तून, ज्या वेदनेतून मी आणि माझे कुटुंब जात आहोत ते मी शब्दातून व्यक्त करु शकत नाही. पुढे ती म्हणते, आज इस्त्रायल संकटात आहे. हमास दहशतवाद्यांच्या रडारवर मुलं, महिला आणि वृद्ध आहेत”. मंगळवारी माझ्या बहिणीसह तिचा नवरा आणि त्यांच्या मुलांचे फोटो शेअर केले होते. कारण सर्वांना आमच्या वेदनांची जाणीव व्हावी. तिने इस्त्रायलची बाजू घेतल्याने अनेकांनी तिला ट्रोलही केले होते.

मधुरा पुढे म्हणते, माझ्या चाहत्यांसोबत माझ्या भावना व्यक्त करु इच्छित होती. ती पुढे हेही म्हणाली की स्वसंरक्षण करणं म्हणजे दहशतवाद नाही. मधुराने आजतक डॉट. ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणते, माझ्या कुटुंबाने मुलगी आणि जावयाला गमावले आहे. माझी बहिण आणि भावोजींची हत्या झाली आहे. त्यांना हमासच्या दहशतवाद्यांनी मारले आहे. माझी बहिण, तिचा नवरा आणि त्यांच्या मुलींसह गाडी ड्राईव्ह करत घरी येत होते. त्यावेळी त्या तीन वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या मुलींच्या डोळ्यादेखत त्यांच्या आई-वडिलांना दहशतवाद्यांनी मारले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhura Naik 🧿 (@madhura.naik)

पुढे ती म्हणते, पोलिसांनी त्या दोन्ही मुलींना बहिणीच्या वडिलांकडे सोडले आहे. आम्हाला रविवारी त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली आहे. ती लोकं दहशतवादी हल्ल्यानंतर बेपत्ता होती. नंतर आम्हाला माहिती मिळाली की, बहिणीच्या नवऱ्याला मारले आहे. मात्र ते कुठे आहेत आणि बाकीचे मेंबर्सचे काय झाले त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. रविवारी त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस अधिकाऱ्यांनी मृतदेहाची ओळख पटवून ताब्यात दिला होता. मुली त्या पोलीस अधिकाऱ्यांकडेच होत्या. तिथली परिस्थिती फार गंभीर आहे. मला माझ्या कुटुंबाची काळजी लागली आहे. हे युद्ध लवकरात लवकर संपावे, माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब इस्त्रायला राहते. आमच्या कुटुंबातील जवळपास 300 लोकं तिथे आहेत. सगळे सुरक्षित ठिकाणी आहेत. फक्त घरातून बाहेर निघून शकत नाहीत. आम्ही आमच्या लोकांच्या संपर्कात आहोत.