
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बिग बी अमिताभ बच्च आणि जया बच्चन यांना अभिषेक याचे चित्रपट पाहून काय वाटते याचा खुलासा श्वेता बच्चन हिने केला आहे. करण जोहरच्या ”कॉफी विथ करण” शोमध्ये श्वेता ही अभिषेकसोबत सहभागी झाली तेव्हा तिने याबाबत सांगितले.
अभिषेक बच्चन याचा मनमर्जिया चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा मी आणि बाबा एकत्र चित्रपट पाहायला गेलो होतो. यावेळी मला बाबा काय रिअॅक्ट होतात हे पाहायचे होते. खरं सांगू का, अभिषेकचा चित्रपट पाहून ते खूपच भावनिक झाले आणि रडू लागले. मी त्यावेळी त्यांना अभिषेकशी बोलण्यासही सांगितले, परंतु ते बोलण्याच्या स्थितीत नव्हतेच, असे श्वेता म्हणाली. तसेच आई जया बच्चन यांनी मनमर्जिया पाहिली नसल्याचेही तिने सांगितले. यामागे भिती हे कारण असून त्यांना अभिषेकचे चित्रपट जास्त आवडत नाही, असेही श्वेताने स्पष्ट केले. तसेच माझे आई-वडील खूप मोठे टिकाकार असल्याचेही तिने सांगितले.
One Big B line is a perfect match for multiple images. Answer with #KoffeeWithShweta and tag @starworldindia to win a Koffee mug autographed by #ShwetaBachchan. #KoffeeWithBachchans #KoffeeWithKaran pic.twitter.com/PIl2uXJET7
— Star World (@StarWorldIndia) January 20, 2019
दरम्यान, मनमर्जिया चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिषेक बच्चन याचा लूक पाहून बिग बी भावूक झाले होते. त्याचा एक फोटो शेअर करत बिग बी यांनी, तुझी आजी, आजोबा, पणजी यांना तुझ्यावर गर्व झाला असता, जसा मला आज होतोत असे कॅप्शन दिले होते.




























































