
>> अभिजीत घोरपडे
ऐतिहासिक जलस्रोतांचे महत्त्व केवळ कारसा म्हणून नव्हे, तर वर्तमानातील उपयोगी जलस्रोत म्हणूनही लक्षात घेतले पाहिजे. आपण कसे टिकलो, किकसित झालो हे समजून घेण्यासाठी जितकी त्यांची गरज आहे तितकेच व्यवहारातही त्यांना महत्त्व आहे. आज अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठीही परावलंबी बनली आहेत. त्यांना दूरवरून येणाऱया पाण्याची वाट पाहावी लागते, पण त्याच वेळी गावातल्या या जुन्या जलस्रोतांकडे झालेले दुर्लक्षही नजरेत भरते.
वर्षाचे बाराही महिने जाणवणारे कडक ऊन, आटलेल्या नद्या, तलाव आणि दुष्काळाच्या झळांनी झाकोळलेला ग्रामीण भाग हेच सध्याचं महाराष्ट्राचं चित्र. पावसाचं प्रमाण कमी झालं की, भविष्यातील पाणीटंचाईबाबत बोललं जातं. मात्र जे आहे ते टिकवणं आणि त्याचा योग्य वापर करणं याबाबतही जागरुकता निर्माण झाली पाहिजे. गतकाळातून आलेल्या जलसंवर्धनाच्या पद्धती, इतिहासकालीन जलव्यवस्था टिकवणं, त्यांचं जतन करणं व त्यांची कार्यपद्धती जाणून त्यांचा पुनर्वापर करणं याही गोष्टी घडल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात फिरताना अनेक इतिहासकालीन जलव्यवस्थांचे निरीक्षण करता आले. क्याख्यानाच्या निमित्तानं तुळजापूरला गेलो असता तिथल्या बारवांकडे लक्ष वेधले गेले. भल्यामोठय़ा आकाराच्या एकूण 27 बारका तिथे पाहता आल्या. कितीही संख्येनं भाविक येऊ दे, तरी पाण्याची टंचाई भासणार नाही. खरं तर तुळजापूर हे उंचावर असलेलं ठिकाण. गावातून वाहणारी मोठी नदी नाही, ना माथ्यावर मोठा तलाव. या बारकांनी त्याची उणीव भरून वाढली होती, पण हा झाला भूतकाळ! पूर्वी या बारवा चांगल्या स्थितीत होत्या तेव्हा पाण्याबाबत संपन्नता होती. मात्र कालांतराने या बारवांचे उकिरडे झाले अन् तुळजापूरही पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध बनलं. शेकडो वर्षांचा वारसा असलेल्या या बारवा आता केविलवाण्या बनल्यात. उकिरडा बरा म्हणावा अशी अवस्था. या बारवेच्या शेजारी बारवेच्याच पाण्यावर जगणारा एक हापसा. बारवेची कचराकुंडी करत हापसा मारणारं दृश्य केविलवाणं वाटलं.
चांदवडचा हापसा आणि तिथली नरुटी बारव आठवली यावरून. हे अहिल्यादेवी होळकर यांचं गाव एकेकाळी तिथल्या सुंदर जलव्यवस्थांसाठी प्रसिद्ध होतं. बारवा, तलाव, पुष्करण्या, कुंड आणि सर्वांवर कडी म्हणजे रंगमहालातील बारव. तीन ते चार मजल्यांची आखीव रेखीव बारव. ती आजही चवदार, नितळ पाण्याने डबडबलेली आहे. 1972 च्या दुष्काळातही तिचं पाणी कायम होतं. त्या वर्षी भीषण दुष्काळात तिने कशी तहान भागवली याच्या कहाण्या आजही ऐकायला मिळतात, पण गावातला तीर्थ तलाव, पठारावरचं कुंड यातलं पिवळं पाणी आणि त्यात जमा झालेला कचरा खटकतोच.
कोरड्या पट्ट्यातल्या आटपाडीची कथा तर कहरच. सांगली जिल्ह्याचा हा अवर्षणग्रस्त परिसर. प्रसिद्ध माणदेशाचा भाग. रखरखीत. हिरवी शेतं-पिकांऐवजी शेळ्या-मेंढय़ांचं सहज दर्शन. जुन्या बारका, विहिरी, आड, तलाव यांच्यासाठी प्रसिद्ध असा भाग. इथं दुष्काळ, पाणीटंचाई याबाबतच्या अनेक कथा ऐकायला मिळतात. बहुतांश गावांमध्ये नदी नाही, असलेच तर लहानसे ओढे. उंचावरचा टापू. त्यामुळे जिल्ह्यातून कृष्णामाई वाहत असली तरी इथं तिचा तसा उपयोग नाही, पण पूर्वजांनी निर्माण केलेल्या जलस्रोतांनी या भागाला पुरेसं पाणी पुरवलं. आटपाडी हे याचं पट्टय़ातलं प्रसिद्ध गाव. आडांसाठी प्रसिद्ध असलेलं. अडीच-तीन फुटांचा व्यास असलेले छोटे आड वाडय़ागणिक सापडतात. गावाचं नाव बहुधा आडांवरूनच पडलं असावं. इथे प्रत्येक वाडय़ात आड पाहायला मिळायचा. आता नसले तरी त्याच्या खाणाखुणा आहेत तिथं. पूर्वी त्यांच्या पुनर्भरणाची व्यवस्थाही अतिशय उत्तम. गावातून शुक्र ओढा वाहायचा. त्याच्या पाण्यामुळं भूजलात पाणी भरायचं आणि या आडांचं पुनर्भरण व्हायचं. अगदी 1972 च्या दुष्काळातसुद्धा यातील काही आड आटले नसल्याचं सांगितलं जातं. अलीकडे मात्र माणसाचं ताळतंत्र बिघडलं आणि मग आडांचंसुद्धा. चारेक वर्षांपूर्वी आटपाडीचे अनेक आड पाहिले – काही कायम असलेले, काही बुजलेले. असंख्य लोकांना जगवणारे आड आज केविलवाणे बनलेत. माणदेशात फिरताना अनेक विहिरींची पडझड झालेली दिसते. तलावांचं बांधकाम मोडकळीला आलेलं दिसतं. वर्षानुवर्षांच्या अवर्षणाला तोंड देण्यासाठी निर्माण केलेली ही साधनं. त्यांचीच ही अवस्था, तर दुष्काळ आपण झेलणार कसे? .
खान्देश हा महाराष्ट्राचा उत्तर भाग. एक अतिशय समृद्ध आणि न्याय्य जलव्यवस्थेचाही प्रदेश. पांजरा नदीच्या काठावर प्रसिद्ध फड पाहायला मिळतात. नदीचं काही पाणी उकळून ते शेतीसाठी वापरायचं आणि वापरून उरलेलं पाणी पुन्हा नदीतच सोडून द्यायचं. नदीचा प्रवाह वाहता राहतोच, शिवाय हवे तेवढं पाणीही काढून घेता येतं. या पाण्याचं वाटपही न्याय्य पद्धतीनं व्हायचं, पण आता त्यांची काय वाईट अवस्था दिसते. पांझरेच्या काठानं फिरताना या व्यवस्थेचे अवशेष दिसतात. पाणी वळवण्यासाठी नदीत घातलेले आणि तिला समांतर असलेले दगडी बांध जागोजागी डोकावतात.
या बदलाच्या ताणाखाली मोठमोठय़ा व्यवस्था मुळासकट उखडून पडल्यात, पण छोटय़ा गोष्टींचं काय? अशा काही व्यवस्थांची सध्याची स्थिती हेलावून टाकते. वऱहेच्या पात्रातील अशी एक जलव्यवस्था म्हणजे – डोह डालणे! आता वऱहा नदी नावालाही उरली नाही. भूजलाची पातळीही इतकी खोल पोहोचली की, मोजके डोह वगळता पाण्याचा मागमूसही दिसत नाही. इतरत्र याच पात्रात अनेक विहिरींची पडझड झालेली दिसते. हेच चित्र सांगलीच्या अग्रणी नदीच्या खोऱयात. तिथं ‘धरणाचा पाट’ ही व्यवस्था होती, जी आता लयाला गेली आहे. या नदीचं पात्र इतकं खोल गेलं की, दगडी बंधारा टाकला तरी काठावरच्या शेताला पाणी देता येईल याची खात्री नाही. ‘धरणाचा पाट’ संपला तो कायमचाच. फलटणच्या पुढे आपण माणदेशाच्या उंबरठय़ावर पोहोचतो. या मोगराळे गावात भलीमोठी बारव आहे. अतिशय देखणी. विशेष म्हणजे बारव्चे सर्व भाग व्यवस्थित पाहायला मिळतात. दुःख इतकंच की, त्यात पाणीच नाही. हीच अवस्था इतर लहानमोठय़ा बारकांची, तलावांची, कुंडांची आणि इतर जलस्रोतांची.
हे असं का व्हावं? नळाचं पाणी आलं म्हणून यांची इतकी हेळसांड! हे खचितच पटणारं नाही – त्यांचं कारसामूल्य पाहता आणि व्यवहार म्हणूनही. वारसा म्हणून त्यांना किंमत आहेच. आपण कसे टिकलो, विकसित झालो हे समजून घेण्यासाठी त्यांची गरज आहेच. त्याचबरोबर व्यवहारातही त्यांना मोठं महत्त्व आहे. आज अनेक गावं पिण्याच्या पाण्यासाठीही परावलंबी बनली आहेत. त्यांना दूरवरून येणाऱया पाण्याची वाट पाहावी लागते, पण त्याच वेळी गावातल्या या जुन्या जलस्रोतांकडं दुर्लक्ष झालेलं नजरेत भरतं. या व्यवस्थांवर आधीच्या पिढय़ांनी खर्च केलाच आहे. मागच्या पिढय़ांची ही गुंतवणूक अशी निकालात काढण्याऐवजी त्यांची डागडुजी केली तर आपली गरज काही प्रमाणात तरी पाण्याची भागेल हे निश्चित. त्यांचा असा वापर करून घेण्यात शहाणपण म्हणायचं की त्यांच्या कचराकुंडय़ा बनवण्यात? याचा अर्थ असा अजिबात नाही की, आपण जुन्या काळात अडकून पडावं. हा लेख लिहिण्याचा तसा उद्देशही नाही. नवे तंत्र, नव्या सुविधा आवश्यकच. त्या जरूर आत्मसात कराव्यात, पण त्या नादात आधीचं जे चांगलं आहे, ते पायदळी तुडवणं समर्थनीय ठरत नाही इतकंच. या अनास्थेतून मार्ग काढावाच लागेल. अलीकडे पुन्हा या गोष्टींकडे सकारात्मकदृष्टय़ा पाहण्याची नजर वाढू लागली आहे. त्यातून काही जुन्या गोष्टींच्या संवर्धनाचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. आपल्या सहभागानेच या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. ते प्रत्येकाने करायलाच हवे. आम्ही ‘भवताल’च्या माध्यमातून याबाबत आमचा वाटा उचलणारच आहोत. आपली साथ मिळाली तर अनास्थेचे वातावरण बदलायला फारसा वेळ लागणार नाही.
– [email protected]
(लेखक पर्याकरण अभ्यासक आणि ‘भकताल’ नियतकालिकाचे संपादक आहेत.)





























































