पारंपरिक की आधुनिक… घर सजावटीसाठी खास शैली

>> सुनील देशपांडे, इंटिरिअर डिझायनर

घराच्या सजावटीचे नियोजन करताना तुम्हाला नेमके कोणत्या स्टाइलमध्ये घर सजवायचे आहे ते इंटिरिअर डिझायनरला सांगा. म्हणजे तुमचे घर तुम्हाला समकालीन शैलीत हवे की रोमन, पारंपरिक घर सजावट हवी की अजून काही ते ठरवा. या सगळय़ात पहिल्यांदा शैली म्हणजे काय ते समजून घेऊया. तसे तर जवळ जवळ पंचवीसएक इंटिरिअर स्टाइल आहेत, पण आपण काही प्रचलित स्टाइलबद्दल जाणून घेऊयात.

समकालीन डिझाइन शैली – ही आधुनिक शैलीप्रमाणेच असते. फक्त थोडे घटक लक्षात घेऊन केलेले कस्टमाइज्ड फर्निचर व वेगवेगळय़ा रंगांशी खेळून एक देखणा लुक तयार करणे, असे थोडक्यात म्हणता येईल.

पारंपरिक डिझाइन शैली – आपल्याला जर जुन्या काळातील लुक उदाहरणार्थ, मोहगनी वगैरे लाकडाचे आवरण किंवा लाकूड मोल्डिंग्स वगैरे वापरून उदाहरणार्थ जुन्या काळातील डायनिंग टेबल वगैरे ठेवून वेगळा लुक तयार करता येतो.

रस्टिक डिझाइन शैली- यामध्येही साधारण पारंपरिक लुक येतो, पण लाकडाचे बीम वगैरे ठेवले जातात. मिनिमल फर्निचर वॉलवर, पण वूडन पॅनेलिंग करून रस्टिक लुक दिला जातो. ही शैली हिल स्टेशन बंगल्यांमध्ये छान वाटते.

आधुनिक डिझाइन शैली – यामध्ये सगळय़ा आधुनिक गोष्टींचा वापर करून वेगवेगळय़ा आकारांसोबत खेळू शकतो. नवे फिटिंग्ज व फिक्चरचा वापर करता येतो. सुटसुटीत फ्लोअर प्लॅनिंगसकट खोल्यांमधील भिंती पिंवा अडथळे काढून त्या मोठय़ा दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्यातून खुला व प्रशस्त ऐसपैस लुक साधला जातो. समकालीन आणि आधुनिक शैली एकसारख्याच भासतात. तुम्ही शैलींच्या मिश्रणातूनही आपले घर सजवू शकता.

रोमन डिझाइन शैली – नावावरूनच ही शैली लक्षात आली असेलच. रोमन आर्किटचेक्चरमध्ये मोल्डिंग्स, पॅनल, दरवाजा, कमानी वगैरे यांचा वापर आपण इंटिरिअर शैलीमध्ये करून भिंतीवर मोल्डिंग्स वगैरे वापरून पेस्टल शेड्सचा वापर केला जातो.

मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण यातील काही मिश्र शैली वापरून पण घर सजवू शकतो. जर आपण घर घेतल्यानंतर त्याचा साधारण कसा लुक वा स्टाइल अपेक्षित आहे याचा अंदाज आपल्या डिझायनरला दिलात तर तो त्यामध्ये आणखी भर घालून एक सुंदर डिझाइन तयार करेल व तुमच्या गरजांनुसार तुमचे घर सजवेल.

आज पण घर सजावटीच्या काही प्रचलित शैली पाहिल्या. चला तर मग वेगवेगळे आकार, रंग, साहित्य, लाइट्स, आर्टिफॅक्टस व अशा अन्य गोष्टींचा वापर करून छान, रंगीत, प्रशस्त असे घराचे रूप साकारू या. पुढील लेखात विविध घटकांचा वापर करून घर अजून कसे छान करावे, याविषयी जाणून घेऊ या.