
>> डॉ. पद्मा श्रीवास्तव
(लेखिका मदरहूड हॉस्पिटल्सच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ लुल्लानगर, पुणे येथील सल्लागार आहेत)
>> डॉ. भारती ढोरेपाटील
(लेखिका पुण्याच्या नोव्हा फर्टिलिटी येथील वंध्यत्व निवारण तज्ञ तसेच सल्लागार आहेत)
क्षयरोग (टीबी) फुप्फुसावर गंभीर परिणाम करतोच, परंतु गर्भाशयात आणि फेलोपियन टय़ूबमध्येही क्षयरोग पसरू शकतो, ज्यामुळे गर्भधारणा गुंतागुंत किंवा वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. गर्भधारणेदरम्यान होणारे क्षयरोगाचे निदान गर्भवती महिलांसाठी आणि बाळासाठीही धोकादायक असू शकते, जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर धोका निर्माण होऊ शकतो. टीबीमुळे होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
क्षयरोग (टीबी) हा एक जीवघेणा संसर्गजन्य रोग आहे जो फुप्फुसावर परिणाम करतो. हे मायक्रोबॅक्टेरियम टय़ूबरक्युलोसिस नावाच्या जिवाणूमुळे होते. क्षयरोगाला आमंत्रण देणारे जिवाणू खोकताना आणि शिंकताना हवेमार्गे एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तीकडे पसरतात. खोकला, छातीत दुखणे, वजन कमी होणे, भूक न लागणे, थकवा, ताप, रात्री घाम येणे आणि थंडी वाजून येणे ही टीबीची लक्षणे आहेत. टीबीच्या प्रकारातील ऑक्टिव्ह टीबी हा एक आजार आहे, ज्यामध्ये टीबीचे जिवाणू झपाटय़ाने वाढतात. आणि शरीराच्या वेगवेगळय़ा अवयवांवर आक्रमण करतात. मिलिटरी क्षयरोग हा संपूर्ण फुप्फुसाच्या उतींना प्रभावित करतो आणि गंभीर समस्या निर्माण करू शकतो आणि गर्भवती महिलांना टीबीचा त्रास होऊ शकतो. क्षयरोगाच्या गुंतागुंतीमध्ये गर्भपात, मुदतपूर्व प्रसूती, कमी वजनाचे बाळ आणि नवजात बालकांमधील मृत्युदर यांचा समावेश होतो. गरोदरपणात सक्रिय टीबीचा संसर्ग झाल्यास आई आणि बाळाला धोका होऊ शकतो. परंतु उपचाराने सर्व गुंतागुंत टाळता येतात. हा आजार पुनरुत्पादक आरोग्याच्या बाबतीत क्षयरोगाचे जिवाणू (टीबी बॅसिलस) फॅलोपियन टय़ूबला संक्रमित करतात आणि यामुळे फॅलोपियन टय़ूबमध्ये अडथळा येऊ शकतो. गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱया महिलांसाठी जननेंद्रियाचा क्षयरोग हा चिंतेचा विषय आहे; कारण त्यांना प्रजननासंबंधी समस्या येऊ शकतात. जरी त्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसला तरीही त्यांच्या मासिक पाळीत समस्या येण्याची दाट शक्यता असते. क्षयरोगाचा परिणाम फेलोपियन टय़ूबवर होत असल्याने फलित अंडी नलिकेत प्रवेश करू शकत नाही आणि गर्भाशयात पोहोचू शकत नाही. जर एण्डोमेट्रियमच्या अस्तरावर परिणाम झाला असेल तर गर्भाशयात फलित भ्रूण रोपण होत नाही. तसेच राखीव अंडय़ांची क्षमता कमी होते.
जननेंद्रियाचा क्षयरोग हा एक सायलेण्ट किलर आहे, ज्यामध्ये वंध्यत्वाशिवाय कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मासिक पाळीत अनियमितता, ओटीपोटात दुखणे आणि योनीतून असामान्य स्राव होणारे रुग्ण केवळ काही टक्के आढळतात. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या किंवा कर्करोग, मधुमेह आणि एचआयव्हीसारख्या रोगांचे निदान झालेल्या लोकांना जननेंद्रियाच्या क्षयरोगाचा धोका जास्त असतो. जननेंद्रियाच्या टीबीमुळे गर्भपात आणि एक्टोपिक गर्भधारणा होऊ शकते. एंडोमेट्रियल बायोप्सी, मासिक पाळीच्या रक्ताची चाचणी जननेंद्रियाच्या टीबीचे निदान करण्यात मदत करू शकते. लेप्रोस्कोपी जननेंद्रियाच्या अवयवांना झालेले नुकसान समजण्यास मदत करू शकते. जननेंद्रियाच्या क्षयरोगाचा शोध लागताच त्याचा सामना करणे आवश्यक आहे. जननेंद्रियाचा क्षयरोग असलेल्यांवर एटीटी (अँटी-टय़ूबरक्युलर उपचार) उपचार केले जातात. त्याचे वेळीच निदान झाल्यास गर्भधारणेतील अडचणी दूर करता येतात. जननेंद्रियाच्या टीबी असलेल्या महिला आयव्हीएफसारख्या सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञानाच्या (एआरटी) मदतीने गर्भधारणा करू शकतात. त्यांच्यावर फक्त आयव्हीएफ (टेस्ट टय़ूब बेबी) उपचार केले जाऊ शकतात.





























































