
कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने कमी होत असल्यामुळे 15 फेब्रुवारीपासून कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी सोमवारी केली. नाईट कर्फ्यूसह अनेक निर्बंध मागे घेण्यात येणार असून मॉल, चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. त्यामुळे आसाम हे देशातील पहिले निर्बबंधमुक्त होणारे राज्य ठरणार आहे. येत्या दोन महिन्यांत शालेय बोर्डाच्या परीक्षा, महापालिका आणि पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. परीक्षा आणि लग्न सोहळ्यांसाठी दोन लसीचे डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. मात्र, निर्बंध उठवल्यानंतरही मास्क वापरणे सर्वांसाठी बंधनकारक राहणार आहे, अशी माहितीही सर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.




























































