अरे बापरे….सुपरमार्केटमधून आणलेल्या सलाडच्या पाकिटातून निघाला विषारी साप

snake-lands-on-woman-head-as-she-opens-door-of-her-house-in-mississippi

झाडांवर, रस्त्यांवर साप दिसणं त्यात काही नवीन नाही. पण जेव्हा खाण्याच्या सामानात एखादा विषारी साप आढळतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच धडकी भरते. असाच ऑस्ट्रेलियातील एक प्रकार समोर आला आहे. सुपरमार्केटमधून आणलेल्या सलाडच्या पिशवीत चक्क विषारी साप दिसला आणि सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली.

द गार्डिअन वृत्तानुसार ही घटना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील आहे. अलेक्झेंडर व्हाइड आपली पत्नी एमिली नेटी सोबत सिडनीच्या एका सुपरमार्केटमध्ये गेले होते. त्या माणसाने तिथून पालेभाज्या आणि सलाड खरेदी केले होते. सर्व सामान घेऊन तो घरी आला. घरात पोहोचल्यावर जेव्हा त्याने ते पॅकेट उघडायला गेला तेव्हा आतमध्ये काहीतरी वळवळल्यासारखे वाटले. सुरुवातीला तो लहान किडा वगैरे असेल असा कयास त्याने लावला. मात्र, थोड्यावेळाने तो साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तो साप त्या पॅकेटमध्ये फिरत होता आणि त्याची छोटी जीभ बाहेर काढत होता.

तो साप म्हणजे 20 सेमी लांबीचं सापाचं पिल्लू होतं. मात्र तो भयंकर विषारी होता. मिळालेल्या माहितीनुसार सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेटेड ग्रॉसरीमध्ये झोपला होता, जिथे पालेभाज्या ठेवल्या होत्या. साप पहिल्यानंतर या जोडप्याने वन्यजीव संस्थेला त्याबाबत माहिती दिली.

त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा साप ऑस्ट्रेलियात असलेल्या सगळ्यात विषारी सापांपैकी एक आहे. त्या माणसाने हेही सांगितले की ज्या सलाडच्या पाकिटात हा साप मिळाला तेव्हा ते सलाड फेकले नाही. ते स्वच्छ धुऊन मग सलाड खाल्ले. सध्या सोशल मिडीयावर सलाडमध्ये साप आढळल्याचा व्हिडीओ वायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या