
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या कार आणि बाईकची कॉपी पाहायला मिळेल. मग ती Lamborghini असो की Ducati किंवा इतर कोणताही ब्रँड. मात्र या प्रत्येक कॉपीमध्ये काही फीचर्स हे वेगळे असतातच. दरम्यान नुकतेच चीनने हिंदुस्थानी दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डच्या Himalayan बाईकची कॉपी बनवली आहे. याच नाव चीनमध्ये Hanway G30 ऍडव्हेंचर असे ठेवण्यात आले आहे. आज आपण याच बाईकच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Hanway G30 ही बाईक अधिक आकर्षक बनवण्यासाठी चीनने यात अतिरिक्त किट्स दिले आहेत. ज्यात स्पोक व्हील्स, टीएफटी इंस्ट्रूमेंट्स क्लस्टर, यूएसडी फॉक्स व डीआरएल सह एलईडी हेडलॅम्प्स सारखे फीचर्स दिले आहेत. हे फीचर्स हिंदुस्थानात उपल्बध असलेल्या Himalayan बाईकमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. चीनने या बाईकची किंमत 1.92 लाख रुपये इतकी ठेवली आहे. जी Himalayan बाईकच्या तुलनेत खूप स्वस्त आहे.
Hanway G30 मध्ये 249 सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 26bhp ची पॉवर आणि 22 एनएम टॉर्क जनरेट करते. ही बाईक डबल क्रॅडल चेसिससह येते. जे Himalayan मध्येही आपल्या पाहायला मिळते. असे जरी असले तरी Hanway G30 ही Himalayan बाईकच्या तुलनेत कमकुवत आहे.




























































