
हिंदुस्थानात यशस्वी लॉन्चिंगनंतर Honda ने आपली क्रुझर बाईक CB 350 RS जपानी बाजारात लॉन्च केली आहे. कंपनीने या बाईकची किंमत 5,94,000 येन (रुपये 3.94 लाख) ठेवली आहे. तर हिंदुस्थानात याची किंमत 1.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.
जपानी बाजारात ही बाईक दोन नवीन रंगात लॉन्च करण्यात आली आहे. या रंग पर्यायांमध्ये पर्ल डीप मड ग्रे आणि गनमेटल ब्लॅक मेटलिकचा समावेश आहे. तसेच हिंदुस्थानात ही बाईक ब्लॅक इन रेडियंट रेड मेटलिक आणि पर्ल स्पोर्ट्स यलो या रंगात लॉन्च करण्यात आली आहे.
Honda CB350 RS मध्ये 348.6cc चे सिंगल-सिलेंडर एअर कुल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 5,500rpm वर 20.78bhp ची पॉवर आणि 3,000rpm वर 30Nm टॉर्क जनरेट करते. हेच इंजिन H’ness CB350 मध्येही देण्यात आले आहे. याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.
फीचर्स

यात अॅनालॉग काउंटरसह एक लहान-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि एक लहान डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. आरएस कन्सोलवर तुम्हाला होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी), एबीएस, साइड स्टँड इंडिकेटर, ईसीओ इंडिकेटर, रीअल-टाइम मायलेज, अॅव्हरेज मायलेज, एचएसव्हीसीएस (स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टम), गिअर पोजीशन, फ्यूल फ्री टाइम आणि बॅटरी व्होल्टेज सारखे फीचर्स मिळतात.




























































