बालमोहन विद्यामंदिरने 100 टक्के निकालाची परंपरा राखली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेने दहावीच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून सलग सोळाव्या वर्षी सीबीएसईचा निकाल 100 टक्के लागला आहे.

बालमोहन शाळेतील 26 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. यात सुरभी आठवले हिने 97.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तिने सामाजिक शास्त्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर विजेता अमृथ याने 97.60 टक्के, रिओनी संगोई 97.20 टक्के, गौरी कानिटकर 97.20टक्के, दिवित कोवळी 96.80 टक्के गुण मिळवले आहेत. या चौघांनीही आय.टी.मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. तर आदित्य प्रधान 97.40 टक्के, आयन पोवारने 97.20 टक्के गुण मिळवले आहेत.