
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 24 सामने झाले आहेत. मात्र, कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयाची पाटी अद्यापि कोरीच आहे. स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी धडपडत असलेल्या कोलकात्याला शुक्रवारी रात्री गुजरात टायटन्सचे कडवे आव्हान असेल. लागोपाठच्या दोन विजयांमुळे मनोबल बळावलेल्या गुजरात टायटन्स आता अहमदाबादमधील घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळविण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे केवळ पावसाच्या कृपेने एक गुण मिळालेल्या कोलकात्याला विजयाचे खाते उघडण्यासाठी सर्वच आघाड्यांवर सरस खेळ करावा लागणार आहे.



























































