
पाकिस्तानच्या नौदलाला बलुच बंडखोरांनी आव्हान दिले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱया बलुच लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वतःच्या नौदलाची स्थापना केली आहे. ‘हम्मल मेरिटाईम डिफेन्स पर्ह्स’ या नावाने बीएलएने नौदल स्थापन केले. ते एवढय़ावरच थांबले नसून स्थापनेनंतर लगेच त्यांनी ग्वादर बंदराजवळच्या जिवानी परिसरात पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजावर पहिला हल्ला केला असून त्यात तीन सुरक्षा कर्मचाऱयांचा खात्मा केल्याचा दावा बीएलएने केला आहे. हल्ल्यात ठार झालेल्या सुरक्षा कर्मचाऱयांची नावेही बीएलएने उघड केली आहे. त्यात नाईक अफझल, जमील आणि उमर या तिघांची ओळ असल्याचे बीएलएने म्हटले आहे. बीएलएनचीनच्या मदतीने पाकिस्तान ग्वादर बंदर विकसित करत आहे. त्यास या घडामोडींमुळे मोठा धोका निर्माण झाला असून पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे.































































