पंजाबमध्ये भीषण अपघात, भाविकांची बस उलटून 6 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील फतेहगड साहिब येथे आनंदपूर साहिबवरून परतणाऱ्या भाविकांची बस उलटून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात 21 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास बस्सी पठाणा येथील मौरिंडा-चुन्नी मार्गावरील हिंमतपुरा जवळ घडली. अपघातातील सर्व भाविक फतेहगड साहिबमधील ‘मेन माजरी’ येथील रहिवासी होते. बैसाखीच्या निमित्ताने रूपनगर जिल्ह्यातील आनंदपूर साहिब येथे दर्शन घेऊन ते घरी परतत होते. बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरच उलटली.