
गोपाळगंजमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका विधवा सुनेचे सासऱ्यावर प्रेम जडले. दोघं प्रेमात इतके बुडाले की त्यांनी समाजाचा विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नात्याला विरोध करत लग्न होऊ न देण्याचा चंग बांधला. अखेर पोलिसांनीच यावर तोडगा काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपाळगंज जिल्ह्यातील भोरे ठाणे क्षेत्रातील दुबवलिया गावातील एका तरुणाचा सहा महिन्यांपूर्वी ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. या घटनेनंतर चार मुलांची जबाबदारी पत्नीच्या अंगावर आली. घरावर दुख:चा डोंगर कोसळला असताना त्याचवेळी महिलेचे चुलत सासरे तूफाने साह देवासारखे आले. मुलं आणि त्यांच्या आईची ते काळजी घेऊ लागले. त्यांना हवं नको ते पाहू लागले. हे सगळं पाहून विधवा सीमा त्यांच्या प्रेमात पडली.
सीमा आणि तूफानी यांच्या नात्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. नातेवाईकांनी त्यांच्या नात्याला विरोध केला. काही बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. समाजाची भिती दाखवून नातेवाईक त्या महिलेला लग्न करण्यापासून रोखत होते. पोलिसांनी देखिल त्यांना बरेच समजावले. मात्र त्यांनी एकमेकांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर नाईलाजाने पोलीस ठाण्यातच त्यांचे लग्न लावावे लागले. ठाणे प्रभारी यांच्या उपस्थितीत तेथील मंदिरात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली. त्यानंतर सासऱ्यांनी सुनेच्या भांगेत सिंधूर भरले आणि त्याची सून त्याची बायको झाली.





























































