
न्याय मागण्यासाठी पोलीस स्थानकाच्या चकरा मारणाऱ्या पीडित महिलेसोबत अश्लील भाषेत संभाषण केल्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलीसमधील अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. रोहदास जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हायरल ऑडिओमधील पोलीस धरमपुरा पोलीस स्थानकाचा प्रमुख असून के.एन. यादव असे त्याचे नाव आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला एका मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा म्हणून पोलीस स्थानकात चकरा मारत होती. मात्र पोलीस स्थानकाचा प्रमुख के. एन. यादवने गुन्हा दाखल केला नाही, उलट पीडितेला मदतीच्या नावाखाली फुस लावून तिला ब्लॅकमेल करू लागला. पोलीस अधिकारी असल्याने महिलेने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले, मात्र एक दिवस मजनू अधिकाऱ्याने फोन करून पीडितेजवळ आपला इरादा स्पष्ट केला.
आरोपी पोलीस महिलेशी अश्लील भाषेत संभाषण करू लागला. पोलीस अधिकाऱ्याच्या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. रोहतास जिल्ह्याचे एसपी यांनीही दखल घेत चौकशीचे आदेश दिले. अखेर एसपी यांच्या निर्देशानंतर कामेश्वर नारायण यादव याला संझौली पोलिसांनी अटक केली. डीएसपी राजकुमार यांनीही या अटकेला दुजोरा दिला आहे.





























































