
सामना प्रतिनिधी । शिरोळ
तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी शिरोळ दरम्यान रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ अज्ञात ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने संतोष केदारी चिट्टी (वय 30.रा. संभाजिपुर ता. शिरोळ) हा जागीच ठार झाला. दरम्यान ट्रक ने अपघातानंतर न थांबता पळून गेला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की जगदाळे हॉल येथे मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून संतोष चिट्टी व त्याचा मित्र संग्राम दळवी हे दोघेजण दुचाकीवरून शिरोळच्या दिशेने जात असताना पहिल्या पेट्रोल पंपा जवळ आली असता पाठीमागून अज्ञात ट्रकने धडक दिल्या दिली. या अपघातात संतोष चिट्टी हा जागीच ठार झाला तर संग्राम दळवी हा रस्त्याच्या बाजूला पडल्याने तो जखमी झाला आहे.
दरम्यान आमदार उल्हास दादा पाटील हेदेखील वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार उल्हास पाटील युथ फाउंडेशन चा संतोष चिट्टी हा कार्यकर्ता असल्याने आमदार समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. नगरसेवक पराग पाटील हे देखील घटनास्थळी उपस्थित होते दरम्यान संतोष याला 3 वर्षाचा एक मुलगा व दीड वर्षाची एक मुलगी असे असून त्याच्या अपघाती निधनाने संभाजीपुरसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






























































