
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या मालदीवमध्ये एन्जॉय करत आहे. दीया आणि तिचा पती वैभव रेखी लग्नानंतर सुट्टीसाठी मालदीवमध्ये गेले आहेत. आता दियाने तिचे मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत.

दीया मिर्झाने ग्रीन बिकिनी आणि फ्लोरल श्रग घालून काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही दीया मिर्झाला समुद्रासमोर पोझ करताना पाहु शकता. दीयाच्या पतीने तिचे हे फोटो क्लिक केल्याचे तिने कॅप्शनमध्ये सांगितले आहे.

दीया मिर्झाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून अनेक जण कमेंट सेक्शनमध्ये तिचे कौतुक करत आहेत. ती मालदीवमध्ये खूप एन्जॉय करत असल्याचे ती म्हणाली आहे.

दरम्यान, दीया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी वैभव रेखीशी लग्न केले.


































































