सीमा प्रश्नावर तत्काळ ठराव करा ! अजित पवार यांची सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Ajit Pawar

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद उफाळून आलेला असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादावरील ठराव हिवाळी अधिवेशनात आणण्यात यावा, अशी मागणी बुधवारी केली.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने तिथल्या लोकांना बरं वाटावं म्हणून आक्रमक वक्तव्य करीत आहेत. आपल्यादेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर द्यायला हवे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीमावादावरील ठराव आणण्याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा ठराव कधी मांडणार याबाबत आमची सरकारला विचारणा आहे, असे अजित पवार म्हणाले.

बेळगाव, निपाणी, कारवार, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, ही आमची मागणी असून  सीमावादावरील ठराव आल्यास त्याला विरोधी पक्षाचे समर्थन राहील, असे अजित पवार म्हणाले.

 -शंभुराज देसाई

…तर कर्नाटकचे पाणी रोखू

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अरेरावी व उद्दामपणाची आहे. सहन करण्याची मर्यादा असेत. आमचा संयम सुटत आहे. त्यांच्या भाषेच उत्तर देऊ. मराठी भाषिकांवर अन्याय केला तर उन्हाळ्यात त्यांना देण्यात येणाऱया पाण्याचा विचार करू, असा इशारा उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांना आज विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिला. ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे भडकविणारे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच्या अनुसरून नाही. सीमावर्ती भागातील जनतेला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठीशी राज्यातील संपूर्ण जनता आहे. एकही इंच जागा न देण्याची भाषा करीत आहे. एक इंच काय, आम्ही अर्धी इंचही जागा देणार नाही. त्यांना अरेरावीची भाषा थांबविली नाही तर त्याच्या शंभर पटीने आम्हाला बोलता येते असे देसाई म्हणाले.