
आखातातील युद्धाच्या परिणामानंतरही सोने-चांदीचा भाव दीड लाखाच्या पुढेच आहे. भाव वाढूनही ‘अक्षय्य तृतीये’च्या मुहूर्ताच्या खरेदीला रविवारी चांगलीच झळाळी दिसून आली. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह देशभरात सोने खरेदीला मोठा प्रतिसाद लाभला. दिवसभरात सराफा बाजारात 20 हजार कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सोने-चांदी व्यापाऱयांच्या संघटनेतील पदाधिकाऱयांनी दिली.
सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव अजूनही 1.50 लाखांपेक्षा जास्त आहे, तर चांदीचा भावही प्रति किलोग्राम 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या चढय़ा भावानंतरही लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी आपला उत्सवी मूड कायम ठेवला. त्यामुळे रविवारी दिवसभरात सर्वच प्रमुख महानगरांतील सराफा बाजारात सोने आणि चांदीला मोठी मागणी होती. देशभरात 20,000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली.

























































